सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग ७

 वेचलेल्या विचार कणिका - भाग ७

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )

------

आपल्या घरात लावलेल्या प्रतिमाही आपल्यावर हृद्य संस्कार करत असतात. गणपती व देवी यांच्या प्रतिमा साधारणपणे सगळ्यांच्या घरात भिंतीवर लावलेल्या असतात. 

समर्थ रामदासांची प्रतिमा सांगत आहे, "बलवंत व्हा, संघटित व्हा, समाजकल्याणासाठी तत्पर रहा. स्वाभिमानाने जगा व स्वावलंबी व्हा”. 

राणी लक्ष्मीबाईची प्रतिमा सांगत असते," अन्यायाचा प्रतिकार करा. त्यासाठी सदैव तत्पर रहा!”

 देवी अहिल्याबाई सांगतात,"स्वत:चे जे जे काही आहे त्याचे रक्षण करा, समाज माझा व मी समाजाची हे सर्वांचे जीवनसूत्र बनले पाहिजे!”

जिजाबाई सांगतात," मातृत्वभाव व्यापक व विस्तारित करा. 

 घरात अशा संस्कार करणाऱ्या प्रतिमा असतील तर त्या आपल्याला कर्तव्यपालन करण्याची आठवण देतील. येणारा जाणारांना प्रेरणा देतील व लहानांवर चांगले संस्कार करतील. 

-------------------------------------------------

तिथींची गंमत


वर्ष प्रतिपदा, यम द्वितिया, अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, नागपंचमी, चंपाषष्ठी, रथसप्तमी, गोकुळाष्टमी, रामनवमी, विजयादशमी, आषाढी एकादशी, वामन द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, कोजागिरी पौर्णिमा, पिठोरी अमावस्या. 

ऊद्या कोजागिरी पौर्णिमा. 

को जागर्ती विचारणारी, ज्येष्ठापत्य निरंजनम् ची. 

सर्वांना सर्व तिथींना शुभाशीर्वाद व शुभेच्छा. 

-----------------------------------------------


आज कोजागिरी पौर्णिमा. आजच्या पौर्णिमेची एक वेगळी गंमत आहे. आज सकाळी चतुर्दशी आहे. खरे तर सकाळी असलेली तिथीच त्या दिवसाची तिथी मानली जाते. पण दुपारी पौर्णिमा लागत आहे. ऊद्या दुपारी संपत आहे. म्हणजे उद्या पौर्णिमा. पण कोजागिरीच्या पौर्णिमेला चंद्राचे महत्व असते. 

उद्या रात्रीचा चंद्र पूर्ण गोल असणार नाही.  म्हणून आज पौर्णिमा.  आजची पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांपेक्षा अधिक शुभ्र चांदणे असलेली असते. 

आज ज्येष्ठापत्याला ओवाळून, त्याला जणू त्याच्या स्वकुल व पर्यायाने स्वराष्ट्र यांच्याबद्दल त्याच्या असलेल्या कर्तव्याची जाणीव दिली जाते व तसे संस्कार बाल्यावस्थेपासूनच घडवले जातात. 

दूध आटवून ते चंद्राच्या शुभ्र चांदण्यात ठेवायचे, तास दीड तासाने ते अनेकजणांनी एकत्र येऊन, चंद्राचा प्रसाद म्हणून घ्यायचे. एकत्र येऊन गप्पा, खेळ, गाणी यांचा आनंद लुटायचा व हे सर्व चांदण्यात. 

------------------------------------------


बिरूदावली व ती कोणाची

समर्थ - रामदासस्वामी

लोकमान्य - टिळक

स्वातंत्र्यवीर - सावरकर

महात्मा - गांधीजी व फुले

योगी - अरविंद

छत्रपती - शिवाजीमहाराज

नेताजी - सुभाषचंद्र बोस

आचार्य - अत्रे, विनोबा भावे

सरदार - वल्लभभाई पटेल

शिवशाहीर - बाबासाहेब पुरंदरे

पंडित - नेहरू, मदनमोहन मालवीय, भीमसेन जोशी

संत- तूलसीदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव

सेनापती - तात्या टोपे

भगिनी - निवेदिता

गानसम्राज्ञी - लता मंगेशकर

आद्य क्रांतिकारक - वासुदेव बळवंत फडके

महर्षी - धोंडो केशव कर्वे

----------------------------------------------


प.          पिलावळ

पोरबंदर - माकडाचे पोर

शिशुपाल- पालीचे पिल्लू

बुलककार्ट- बैलाचे कार्टै

काऊ बाय- कावळ्याचा मुलगा

पोपटलाल- पोपटाचा लाल म्हणजे मुलगा

सिंहासन- सिंहाचा सन म्हणजे सिंहाचा मुलगा

पोरकिडा- किड्याचे पोर

बाळ कुर्तडकर - कुरतडणाराचे ( ऊंदराचे) बाळ

बाळू - बाळ+ ऊ- ऊचे बाळ

बग(ल) बच्चे - ढेकणाची पोरे

----------------------------------------


कृपण कोण?

आपल्याजवळचे ज्ञान व विद्या ईतरांना न देणारा अहंकारी विद्वान, दानधर्म न करणारा लोभी धनिक, दानधर्माचा देखावा करून निरुपयोगी वस्तू दान करणारा ढोंगी दाता, दान चांगल्या वस्तूंचे पण आपल्या नातलगांनाच देणारा. 

अहंकारी विद्वान कोणीही ज्याच्याकडे फिरकत नाही असा फळाफुलांनी भरलेला आम्रवृक्ष झाला. 

दानधर्म न करणारा धनिक बैल झाला. 

आपसात दान करणारा कडवट पाण्याचा तलाव झाला. 

नापीक जमीन देणारा वांझ गाय झाला. 

आपल्या तपश्चर्येचा गर्व असणारा माजलेला हत्ती झाला. 

----------------------------------------------


गुरू

गुरू म्हणजे ग+उ+रू

ग म्हणजे गणेश बुद्धीदेवता

उ म्हणजे विष्णु

र म्हणजे सर्व शुद्ध करणारा अग्नी 

आणखी एक अर्थ

ग - व्रताबद्दलची निष्ठा

ऊ - अव्यक्तातून व्यक्त होणारे 

रु - क्रोधावर नियंत्रण हवे हे सांगणारे गुरू. 

सत्वगुणी लोक मनापासून अतिथीचा सत्कार करतात. 

रजोगुणी अतिथीकडून काही मिळणार असेल तर करतात. 

तमोगुणी त्यांच्या दुष्ट कार्यात सहभागी होऊ शकणाऱ्याचा सत्कार करतात. 

---------------------------------------------

रामनाम

राम राम

राम राज्य

रामबाण औषध

रामफळ

यात काही राम नाही

सुतराम शक्य नाही

पुरे झाले रामायण

स्वल्पविराम

मुखमे राम बगलमे छुरी

त्याने राम म्हटले

अखेरचा राम राम ठोकला

अमुचा राम राम घ्यावा

-----------------------------------------------

माते दुर्गे जे तुझे स्मरण करतात, त्यांची भीती तू नाहीशी करतेस. तुझे एकाग्र चित्ताने स्मरण करणाऱ्यास चांगली बुध्दी देतेस. अंतःकरणात स्नेह असणारी व सर्वांवर उपकार करण्यास सदैव सिद्ध असणारी अशा तुझ्याशिवाय आमचे दारिद्र्य, दु:ख, भय दूर करणारी दुसरी कोणी नाही. 

सर्व मंगलाला मंगलता प्रदान करणारी, सर्व शुभेच्छा ‌पूर्ण करणारी, त्रिनेत्रधारी गौरवर्ण आणि नारायण स्वरूपी देवी तुला माझे शतकोटी प्रणाम. 

---------------------------------


अंबाजोगाई ची योगेश्वरी

काही चित्पावन ब्राम्हण मराठवाड्यात स्थलांतरित झाले. दंतासुर राक्षसाचा उपद्रव फारच वाढला तेव्हा काही भाविक गुहागरला गेले व त्यांनी दुर्गादेवीची प्रार्थना केली व दंतासुराचे पारिपत्य करण्याची तिला विनंती केली. 

दंतासुराला वर होता की त्याचा वध कोणताही देव वा पुरुष करू शकणार नाही. ते कार्य एखाद्या स्त्रीकडूनच होईल. 

दुर्गादेवीने मराठवाड्यात येऊन त्याला मारले. श्रमाने ती थकली. होती, म्हणून तेथील एका आंब्याच्या झाडाखाली ती विसावली व तेथेच स्थित झाली म्हणून त्या गावाचे नाव अंबाजोगाई असे पडले. योगायोगाने हे घडले म्हणून तिचे नाव योगेश्वरी झाले. 

आणखी एक कथा

भोलेनाथाशी लग्न करण्याची इच्छा असल्याने दुर्गादेवी परळीस परळीला वैजनाथ आहे तिथे जाण्यासाठी ती निघाली. गोरज मुहूर्त होता. ती काही कारणाने वेळेवर पोचू शकली नाही. तेथे तिची वाट पहात असलेला भोलेनाथ रागावून निघून गेला. -----------------

उत्सव

मनुष्याला उन्नत बनवतात ते उत्सव.

भारताचा सांस्कृतिक इतिहास पुस्तकांच्या पानात नव्हे तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिलेला आहे. 

कार्याच्या सातत्याने निर्माण झालेल्या नी‌रसतेला उत्सव दूर करतात. नित्य नाविन्याला आमंत्रण देतात. हृदयात उत्साह निर्माण करतात. त्याची रसिकता टिकवून धरतात. 

उत्सव हे ऐक्याचे साधक आहेत, प्रेमाचे पोषक आहेत, प्रसन्नतेचे प्रेरक आहेत, धर्माचे संरक्षक आहेत व भावनांचे संवर्धक आहेत. 

सर्व उत्सव आनंदाने उत्साहाने एकत्रित येऊन साजरे करण्याचा मनसोक्त आनंद घेऊ या!

संस्कृती पूजन - मा- पांडुरंगशास्त्री आठवले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा