वेचलेल्या विचार कणिका - भाग 17
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
आमच्या योग्य प्रगतीसाठी शासनाला सहाय्य करू! ( यजुर्वेद)
सर्वाचे कल्याण होवो ( यजुर्वेद)
प्रजा अजेय व अक्षय अशा क्षात्रतेज व पराक्रम यांनी युक्त व्हावी(ऋग्वेद)
उत्तम प्रजा'; उत्तम राष्ट्र(अथर्व)
शासन प्रजेचा मित्र व रक्षक असावे( ऋग्वेद)
वेदातील अपेक्षित अपेक्षा पूर्ण होऊ दे !
--------------------------------------------
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
लोकांचे जीवन सुखमय करणारे शासन यशस्वी ठरते(ऋग्वेद) प्रजा सुखी झाली की शासनाची कीर्ती वाढते( ऋग्वेद)
---------------------------
आज काही म्हणी
जाणार् याचे जाते कोठाळ्याचे पोट दुखते!
नाचता येईना अंगण वाकडे!
हपापाचा माल गपापा!
अंतकाळापेक्षा माध्यान्हकाळ कठीण!
अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज!
अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे!
सारा गाव मामाचा - एक नाही कामाचा!
घरोघरी त्याच परी, न सांगेल तोच बरी!
घरातल्यांचा काळ, बाहेरच्यांचा प्रतिपाळ!
काम नाही काडीचे, विसावा नाही घडीचा!
माळ्याचा मळा अन् कोल्ह्यांची भांडणे!
----------------------------------------------
आजच्या दिवशी तीन योग एकत्र आले आहेत
१- शाकंभरी पौर्णिमा - यादिवशी देवी भगवतीची आराधना करतात.
२.गुरुपुष्यामृतयोग - पु्ष्य नक्षत्रात गुरूचे भ्रमण,
गुरुंचे नामस्मरण करावे.
गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करावे.
दत्तगुरुंचे स्मरण करावे.
दत्त म्हणजे ‘ब्रम्हा विष्णू महेश’ यांचे एकत्रित कार्य.
उत्पत्ती- स्थिती- लय यांचा एकत्रित विचार. जणू विश्वाच्या सदैव चालणाऱ्या कार्याचे स्मरण व जाणीव.
आपल्या जन्माचे ज्ञान व मृत्यूचे भान असेल तरच मानव आपले कर्तृत्व सिद्ध करेल व कर्तव्य पार पाडेल. त्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी या दिनाची योजना.
मकरसंक्रमण झाले आहे. अधिकाधिक प्रकाश मिळत आहे. कर्तृत्वाला अधिक वाव मिळतो आहे. असे हे तिन्ही योग एकत्र आले आहेत. त्यापासून प्रेरणा घेऊन कार्यरत होऊ या!
------------------
वंदन
सदर गुणांचा अधिष्ठाता गणनायकाला वंदन.
वाणींची प्रेरक शक्ती असलेल्या सरस्वतीला वंदन.
कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवणार्या रामचंद्रांना वंदन.
पूर्ण पुरुष भगवान श्रीकृष्ण, राष्ट्र गुरू समर्थ रामदास, क्षत्रिय कुलभूषण श्री छत्रपती शिवराय, ऋषीवर श्री दयानंद सरस्वती राष्ट्रद्रष्टे श्री विवेकानंद यांना वंदन.
अंधार दूर करणाऱ्या सूर्याला वंदन.
वरूणदेवाना वंदन.
हिमकणांसारख्या शुभ्र चांदण्याचा वर्षाव करणाऱ्या चंद्राला वंदन.
मार्कंडेय यांचे पूजन, प्रयत्नवादाचा आदर्श, संयम, आरोग्यदायक सवयींचा अंगिकार, युक्ताहारविहार, दृढनिश्चय यासाठी करु या.
अग्नि, सूर्य, इंद्र व आमचे जीवन यशस्वी होण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या सर्वांना वंदन.
चराचरातील सर्व शक्तींनो, ही अमुची प्रार्थना
करा अम्हाला निर्भय निर्मल,उजळू द्या जीवना!
-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा