वेचलेल्या विचार कणिका - भाग १०
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
अग्नी परतणार नाही
अग्नी क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण सकाळी सात वाजता होणार होते. तेवढ्यात पंतप्रधान कार्यालयांतून टी एन शेषन यांचा फोन आला,’ चाचणी थांबवा’. कारण आंतरराष्ट्रीय दबाव! अग्नी साठी विदेशांनी तंत्रसहाय्य नाकारले असतांनाही भारतीय शास्त्रज्ञांनी काम पूर्ण केले होते.
थांबवण्यासाठी निरोप आल्यानंतर शास्त्रज्ञांनी एक क्षण विचार केला व ऊत्तर दिले,”आता परतणार नाही.” त्यानंतर अवघ्या तीन तासांतच अग्नी यशस्वीपणे अवकाशात झेपावले.
ही अग्नीची चाचणी फक्त क्षेपणास्त्राची नव्हती तर ती होती देशातल्या शेकडो युवा शास्रज्ञांची व भारतीय तंत्रज्ञानाची!
आणि या यशाने भारतीय संस्कृतीचा तुरा अधिकच ऊंचावला.
----------------------------------
ब्राम्हण कर्तव्ये
अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, प्रतिग्रह, दान.
अंतःकरणात निग्रह, सहजपणे इंद्रियदमन, सद् धर्मासाठी कष्ट सहन करण्याची क्षमता, मनात क्षमा भाव, अंत:करणात शम, दम, शास्त्र ज्ञान, विज्ञानाची माहिती, आस्तिक्यबुद्धी,
अंतर्बाह्य शुचिता, सरल वर्तन, आत्मज्ञान,
या सर्व गोष्टींनी युक्त असलेली व्यक्ती म्हणजे ब्राम्हण.
हे वाचून लक्षात येईल की ब्राम्हण्य हे गुणांवर आधारित आहे, जन्मावर नाही.
-------------------------------------------------
आज ‘त्रिपुरी पौर्णिमा’. काही जण ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असेही म्हणतात.
तारकासुर राक्षसाने अंतराळात तीन नगरे विश्वकर्मा याच्या कडून बांधून घेतली. एक लोखंडी, दुसरे तांब्याचे व तिसरे रूप्याचे व ती आपल्या मुलांना सोपवली. राक्षसपुत्रांचा दुष्टावा अधिकच वाढला. सर्व पृथ्वीला त्रास देऊन नकोनकोसे केले.
ती तिन्ही पुरे पौर्णिमेला एकत्र येत. त्यावेळी एकाच बाणाने त्यांना छेदले गेले, तरच त्यांचा नाश शक्य होता. काम अवघड होते पण पृथ्वीवरील लोकांना वाचवण्यासाठी आवश्यक होते. शंकरानी ते करण्याचे ठरवले व केलेही!
सर्वांना आनंद झाला व सर्वत्र दिवे लावून तो साजरा केला गेला. तेव्हापासून ही पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा, देवळात पणत्या लावून साजरी केली जाते.
कापसाचे बारीक सूत काढून, त्याच्या साडेसातशे वाती करून, संध्याकाळी त्या तूपात भिजवून देवळात लावण्याची प्रथा आहे. त्या वातीतील अडीचशे वाती दीड फेऱ्याच्या, अडीचशे वाती अडीच फेऱ्याच्या आणि अडीचशे वाती साडेतीन फेऱ्याच्या असतात.
------------------------------------------------------
‘कुठेही जा, बेलाला पाने तीनच’ अशी म्हण आपण वापरतो आणि हेच बेलाचे वैशिष्ट्य आहे.
आज त्रिपुरी पौर्णिमेनंतरचा सोमवार! बेलाची काही वैशिष्ट्ये पाहू या!
बेलाची तीन पाने असतात म्हणून त्याला त्रिपत्रक म्हणतात. या त्रिदलातून शिवाचे त्रिनेत्र व त्रिशूल सूचित होते.
फांद्यांवर पानांच्या बगलेत बळकट काटे असतात. चंडिकेला बेल वाहिला जातो. तिच्या ऊग्र रुपामुळेच या वृक्षावर काटे ऊभे राहिले असे वर्णन कवी बाणाने केले आहे.
बेलफळ वरून टणक असले तरी आतील गर मऊ व चिकट असतो. आयुर्वेदिक औषधी मध्ये बेलफळ, पाने, झाडाची साले, खोडाचा गाभा यांचा उपयोग केला जातो. प्राणवायू पण या झाडापासून मिळतो.
प्राचीन काळी बेलफळालाच श्रीफळ म्हणत असत.
(संवाद पुरवणीमधून)
----------------------------------------------------------
आज एक खेळ सिनेमा संबंधित काही नावे दडली आहेत, ती शोधायची. तुमच्याजवळच ठेवायची. परवा मी ऊत्तरे पाठवीन. बरोबर किती हे पाहून आपली आपण पाठ थोपटून घ्यायची.
१ गलसालानर
२ टपल्हलीरकोदिक
३ रलकुवापपदि
४ शीरनाकपनाळ
५ शकडखेदीबुगरज
६फकसशोराअ
७ र्थुअमसकशो
८ मराव्हीताशां
९टेनारकनापा
१० र श्रीयकडजग
११ अरनाविकर्शीशख
१२. वरलासरेकरये
१३ शखदेशमुतेरी
१४ षमशीमासुणीरो
१५ शारदाखाभेसुवी
१६ करीओशगी
१७ शसालेळेबनि
१८ याडूरकतेंप्रिल
१९ देशमेवर
२० धुडलकममररतो
२१ वळलीरखभादिप्रप
२२ ररलढाकपेंजीभा
२३ लेमीघुचौसर
२४ तागेकशरलमं
२५रवाशकरेसुड
--------------------------------------
महाभारतातील एक श्लोक
नवनीतं हृदयं ब्राम्हणस्य
वाचि क्षुरो निहितस्तीक्ष्णधार:
तदुभयमेतद् विपरीतं क्षत्रियस्य
वाग्नवनीतं ह्रूदयं तीक्ष्णधारं
ब्राम्हणांचे हृदय कोमल असते. वाणी कठोर असते. तर क्षत्रियांचे बोलणे सौम्य असते पण हृदय तीक्ष्णधारेप्रमाणे असते.
-----------------------------------------------------------
परवाच्या कोड्याचे ऊत्तर
१ लालन सारंग
२ दिलीप कोल्हटकर
३ कुलदीप पवार
४ नाना पळशीकर
५ जगदीश खेबूडकर
६ अशोक सराफ
७ अशोक समर्थ
८व्ही. शांताराम
९ नाना पाटेकर
१० जयश्री गडकर
११ अविनाश खर्शीकर
१२ सरला येवलेकर
१३ रितेश देशमुख
१४ सुषमा शिरोमणी
१५ विशाखा सुभेदार
१६ गिरीश ओक
१७ निलेश साबळे
१८ प्रिया तेंडूलकर
१९ रमेश देव
२० मधुकर तोरडमल
२२ भालजी पेंढारकर
२३ समीर चौघुले
२४ लता मंगेशकर
२५ सुरेश वाडकर
------------------------------------------------------
जप
जप ही थोर साधना आहे.
प्रकार
वाचिक - स्पष्ट ऊच्चारण
ऊपांशु - हलक्या आवाजात केलेला
मानस - मनाने चिंतन करून केलेला
ध्यान - अनन्य, ध्वान
मानस जप करणारे वसिष्ठ कसे होते?
विवेकाचे राजा, धर्म हा रथ, धैर्य हा ध्वज, ज्ञान हे कर्म, सदाचार, संतोष हे मर्म, वैराग्य हे मंत्री, विज्ञान मित्र , सदाचार ही सेना, क्षमा हे कवच, यम हे मित्र, नियम हा सेनापती, सद्गूणांचे आचरण, असे मुनी वरिष्ठ वसिष्ठ होते
त्यांना शत शत प्रणाम.
-----------------------------------------
साधना शिधये या एक तिकीट तपासनीस! कामाला ठराविक वेळ व ठराविक गाडी नसते. प्रवासी पण वेगवेगळ्या प्रकारचे व स्वभावाचे असतात. त्यांचा अनुभव -
आम्हाला एक स्त्री म्हणून वेगळी सुरक्षाव्यवस्था नसते. स्वसंरक्षणाची सदैव तयारी ठेवावी लागते. कुठलाही प्रसंग आला तर तो निभावून नेण्याचे कसबही असावे लागते व तशी मानसिकता पण सदैव बाळगावी लागते.
------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा