वेचलेल्या विचार कणिका - भाग 19
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
ईशवास्योपनिषद
सर्व जग ईश्वराच्या अस्तित्वाने व्याप्त आहे हे लक्षात ठेवा. संकुचित व स्वार्थी वृत्तीचा त्याग करा.
साधकाने जीवनात ज्ञान व कर्म यांचा समन्वय साधला पाहिजे. कर्माने अभ्युदय व ज्ञानाने निश्रेयस प्राप्त करून प्रवृत्ती व निवृत्ती यांचा समन्वय हाच वेदोक्त मार्ग आहे.
केनोपनिषद
केन या प्रश्नवाचक शब्दाने सुरवात!
संपूर्ण विश्वाचे संचलन करणाऱ्या ब्रम्हशक्तीला वंदन!
तीच शक्ती आत्मशक्ती बनून ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, प्राण व मन यांना कार्यक्षम ठेवते. अफाट ऊर्जा निर्माण करते.
या ब्रम्हशक्तीनेच देवांनी आसुरी शक्तीवर विजय मिळवला.
कठोपनिषद
यमराज व नचिकेता संवाद
आध्यात्मिक साधनेने साधकाचे चारित्र्य कणखर झाले पाहिजे. चारित्र्याचा आविष्कार फक्त व्यक्तिगत शूचितेने पूर्ण होत नाही. ती शक्ती समाजाभिमुख व्हावी.
शेवटचा मंत्र आहे
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् बोधत!
स्वामी विवेकानंद यांचा आवडता मंत्र!
---------------------------------------
प्रश्नोपनिषद
प्रश्न व उत्तरे असे स्वरुप
काही उत्तरे
प्राणशक्ती हीच सर्वश्रेष्ठ! तिच्यातून पंचमहाभूते, पंचतन्मात्रा पंचप्राण यांचे उगम व प्रकटीकरण होते. यांतच मन मिळवले की या सोळा कलाच्या मदतीने शरीराच्या माध्यमातून ब्रम्ह कार्यरत आहेत.
मुंडकोपनिषद
मुंडक - मुंडनयुक्त संन्यासी
सर्वसंगपरित्यागाचे महत्व सांगितले आहे.
‘सत्यमेव जयते’ हा भारताचा बोधमंत्र यातूनच घेतलेला आहे.
आध्यात्मिक साधकांसाठी सांगितले आहे," नद्या स्वत:चे नामरूप सोडून समुद्रात विलीन होतात. तीच अवस्था साधकाने प्राप्त करायची असते.”
मांडुक्य उपनिषद
सर्वात लहान आहे
ओंकार स्वरूपात भूत वर्तमान भविष्य सामावलेले आहेत
अ- वैश्वानर पाद
उ- तैजस पाद
म- प्राज्ञपाद
शेवटची शांत अवस्था.
--------------------------------
त्तैत्तिरीय उपनिषद
प्रामुख्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणारासाठी उपदेश.
श्रुतींचे अध्ययन व विकारांवर विजय मिळवणाराला ब्रम्हज्ञान प्राप्ती सहज शक्य होते. कारण ती अवस्था निर्भयतेची असते. निर्भयता हा आध्यात्मिक साधनेचा मुख्य निकष आहे.
ऐतरेय उपनिषद
वेदमंत्रांचे द्रष्टेपण व ऋषीपण यांची प्राप्ती जातीवर आधारित नसते.
परब्रम्हाने विश्व निर्माण करतांना आपले ज्ञान त्यात ओतले आहे. म्हणून प्रत्येक घटकात हे ज्ञान असतेच.
छांदोग्य उपनिषद
कर्तव्यकठोर ऊद्दालक ऋषी याचे निर्माता
आपद्प्रसंगी केलेली जीवनमूल्यांशी तडजोड, ती स्थिती संपल्यावर ताबडतोब परत स्थापित करावी.
भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक संपत्ती श्रेष्ठ आहे.
चिंतनातून ज्ञानप्राप्ती होते.
---------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा