रविवार, ३० मार्च, २०१४

श्री गणपत्यथर्वशीर्ष - प्रकरण दुसरे-

गणेशविद्या
"रामरक्षास्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषि: श्रीरामचंद्रोदेवता, अनुष्टुपछंद: " असा उल्लेख रामरक्षेत आहे. रामरक्षा हे जसे स्तोत्र आहे तसाच मंत्रही आहे. "मननात त्रायते इति मंत्र:ज्याचे मनन केले असतां रक्षण केले जाते तो मंत्र असे आपण म्हणतो. शिवाय मंत्राला ऋषी, देवता, छंदही असतात. रामरक्षेत तसा स्पष्ट उल्लेख आहेच.
दुसरा सर्वपरिचित असा गायत्री मंत्र आहे. याचे ऋ्षी आहेत विश्वामित्र, देवता आहे सूर्य छंद आहे गायत्री. गायत्री मंत्राबाबत म्हटले आहे, 'गायंतम् त्रायसे यस्मात् गायत्री त्वं तत:स्मृत:अग्निपुराणांत गायत्रीच्या सप्तव्याहृति दिल्या आहेत. प्रत्येक व्याहृतीचे ऋषी, छंद देवता वेगळ्या आहेत. आधुनिक काळांत वंदेमातरम याला मंत्र मानले आहे. देवता आहे मातृभूमी, ऋषी आहेत बंकिमचंद्र.

या सर्व पार्श्वभूमीवर अथर्वशीर्ष म्हणतांना जेव्हा ’गणक ऋषि:निचृद गायत्री छंद: गणपतिर्देवताअसा उल्लेख येतो. तेव्हा कशासंबधी हे वर्णन आहे अशी उत्सुकता निर्माण होते लक्षात येतेसैषा गणेशविद्या या गणेशविद्येचे वर्णन आहे "गणादिं पूर्वमुच्चार्यपासून तेसंहिता संधि: ’पर्यंत! अन या वर्णनावरून गणेशविद्या म्हणजे भारतीय लिपीशास्त्र होय हे लक्षात येते.
अनेक विविध प्रकारच्या प्रयत्नांनंतरही भारतीय आपल्या आधीन पूर्णपणे होत नाहीत हे लक्षात आल्यावर बुद्धीभेदाचे शस्त्र उपसले गेले. ज्या ज्या गोष्टींबद्दल भारतीयांना आपलेपणा अभिमान वाटतो त्या त्या गोष्टींवर आघात करून कधी ह्या अभिमानास्पद गोष्टी तुमच्या नाहीतच असे प्रसृत केले गेले तर कधी अशा गोष्टींची मूर्खपणा म्हणून निंदा केली गेली. भारताचे लिपीविज्ञानही यातून सुटले नाही. शिक्षणाची विविध शास्त्रांची मौखिक परंपरा अधिक प्रचलित दीर्घकाळ चालत आलेली असली तरी वैदिक काळापासून भारतीय लिपी सक्षमपणे अस्तित्वात होती.
१८व्या १९ व्या शतकांत पाश्चात्यांनीप्राचीन भारतीय ऋषींना लेखनकला अवगत नव्हतीअसे पसरविण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर भारतीयांनी ग्रीकांकडून लेखनविद्या मिळवली भारतीय लिपी (ब्राम्ही लिपी) चे मूळ भारताबाहेर होते ती सेमेटिक लिपीतून निर्माण तर काहींच्या मते फोनेशियन लिपीतून असे प्रसृत केले तर काहींनी ठरवले की ती अरेमिक लिपीतून तयार झाली. तर मॅक्समुल्लर ( बुद्धिभेद करण्यांत याची अहम भूमिका होती) म्हणतो, "भारतीय लिपी ही ..पूर्व ४०० च्या सुमारांस अस्तित्वात आली. आयुष्याच्या उत्तरार्धात या मॅक्समुल्लरला आपले सर्व सिद्धांत बदलायला लागले असे ईतिहास सांगतो. पुढे पुढे तर त्याचा उल्लेख मोक्षमुल्लर असा होऊ लागला. अधिक अभ्यासानंतर काही पाश्चात्यांनीच मान्य केले आहे की भारतीय लिपीच अधिक शास्त्रशुद्ध आहे. एरिक गिल-(टायपोग्राफीसंबंधी लेखन करणारे) म्हणतात,"रोमन अक्षरांमुळे ध्वनीलेखन, मुद्रण योग्य रीतीने करता येते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. "या उलट भारतीय लिपी- आता तिला देवनागरी म्हणतात, ध्वनीशास्त्रावर आधा्रित आहे. उच्चार अक्षर ठरलेले आहे.
म्हणजे '! कधीवाउच्चार होणार नाही. काही इंग्रजी शब्द पाहू या. cut, but- u चा उच्चार पण put मध्ये u उच्चार’. Ram मधल्या a उच्चार , Girl मधल्या G चा उच्चार’. त्यानुसार ’danger ' चा उच्चार हवा डांगर. तो डेंजर का त्याचे कारण नाही.

ध्वनीशास्त्राधारित भारतीय लिपी यासाठी प्रचलित असलेली एक गोष्ट आहे. मौखिक परंपरा राखणे तसे कठीणच होते. हळूहळू ती पुढच्या पिढीत संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यामुळे भविष्यात काय होईल ह्या चिंतेने सनकादि काही आचार्य शंकराकडे गेले. नृत्यनिपुण शंकरांनी आपल्या नृत्याच्या मध्यंतरात आपला डमरूनवपंचवारम' म्हणजे +=१४ वेळा वाजवला. त्यातून ध्वनीसूत्रांची निर्मिती झाली.
ध्वनी का कसा निघतो याचा अभ्यास होऊन कुंडलिनीतून निघणारा ध्वनि स्वरयंत्रात पोचतो तेथून कंठ, दाताजवळची कठीण टाळू, टाळूचा मऊ भाग, दात ओठ ह्यांना साह्यकारी जीभ यांच्या संयोगाने जी प्रकट होते त्या वाणीला वैखरी म्हटले जाते. आधीच्या अवस्था आहेत परा, पश्यंती, मध्यमा. तिच्या प्रकटीकरणांत वरील इंद्रियांचे सहाय्याने जो ध्वनी निघतो त्याच्या उच्चारानुसार त्यांचे पाच गण केले गेले-कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य. पाणिनीने यांना व्याकरणाशी जोडले. या गण पाडणाऱ्या ऋषींनाचगणक" अशी संज्ञा दिली गेली.

वेदपूर्व कालांतील ब्राम्हणस्पती या गणेशाने यांच ध्वनींना लिपीबद्ध केले. पृथ्वी गोल आहे याचा आधार घेत या गोलाकाराचे दोन भाग तीन भाग करून ती ( जणू चित्रलिपी) लिहण्यास प्रारंभ केला. माहेश्वरी सूत्रानुसार ही लिपी (पुढे वैदिक लिपी या नावाने प्रसिध्द) तयार झाली. ’उभे दोन अर्धगोल जोडलेले तरमधे आडवे अर्धगोल, ’मधे गोलाचा / भाग, मधे असाच अर्धगोल त्याला रेघ असे लक्षात येईल.
लिपीचा वापर अधिक होऊ लागला ती सोपी करण्याचे प्रयत्न होऊ लागले. वाचन सुलभ व्हावे या दृष्टीने महाभारत कालांत या गोलांना उभा दंड जोडला गेला. महाभारत लिहिण्यासाठी व्यासांनी गणपतीला पाचारण केले होते याचा अर्थ गणपती हे त्या काळचे श्रेष्ठ लिपीकार होते. त्यांची लेखनगती ही जलद होती. अशी गोष्ट सांगतात की व्यासांच्या प्रतिभेच्या प्रकटीकरणाच्या वेगानेच लेखन करणारा असावा म्हणून गणपतीला बोलावले गेले. त्याचाही आत्मविश्वास दांडगा होता. तो म्हणाला,"मी लिहेन, पण मला थांबावे लागले तर मी निघून जाईन." त्यावर व्यासांनी सांगितले,"हरकत नाही. तशी वेळ येणार नाही. कारण लिहितांना त्याचा अर्थ लक्षात घेऊन तुला लिहायचे आहे" असे सांगतात, की म्हणूनच व्यासांनी मधून मधून कूटप्रश्न घातले. बुद्धीदात्या गणेशालाही ते सोडवण्यासाठी लागणाऱ्या वेळांत व्यासांची पुढील शब्दांची योजना व्हायची."

या सर्वांतून लक्षात येते की महाभारतकालापर्यंत लेखनकला लिपी विकसित झाली होती. काळाच्या ओघांत मौखिक परंपरा लुप्तप्राय होऊ लागली. अर्थातच शिक्षणाचा ओघ वहातच राहिला पण आता त्याला लेखनकलेची साथ जोरकसपणे दिली जाऊ लागली.
लिपीशास्त्रात ज्या तिसऱ्या गणपतीने विकास घडवला तो म्हणजे मध्य भारतातील पद्मावतीचा राजा गणपती नाग हा होय. त्याने गोलाकार उभा दंड याच्यामधील आडवी रेषा 3 यामध्ये अक्षरावरील शिरोरेषा यांची भर घातली. शिरोरेषेने प्रत्येक अक्षर वेगळे समजू लागले. तसाच प्रत्येक शब्दही. (हिंगधडाभर घेऊन ये हे वाक्य शिरोरेषेपूर्वी ही गधडाभर घेऊ नये असेही वाचले जाऊ शकत होते.) बहुधा हा गुप्तकाल होता.

इतिहासपूर्वकालात लिहिण्याची पध्दती उजवीकडून डावीकडे ( उर्दूप्रमाणे ) होती असे मानतात. या गणपती देवाने डावीकडून उजवीकडे लिहण्याची प्रथा पाडली. आता ब्रम्ही लिपी-वैदिक लिपी देवनागरी म्हणून ओळखली जाऊ लागली.
या आधी राष्ट्रकूट, परमार खारवेल यांच्या काळातही लिपीशास्त्रात सुधारणा होत गेल्या होत्याच. या लेखनकार्यात विविध मंत्रांच्या उच्चारणाच्या सवयीमुळे असेल कदाचित पण अनुस्वार केव्हा जोडला गेला हे कळलेच नाही.

हेच सर्व वर्णन गणेशविद्येत आहे. ’गणादिंपूर्वमुच्चार्य’- आधी गणाचा उच्चार (म्हणजे त्या उच्चाराची तयारी), मग वर्णाचा म्हणजे अक्षरांचा उच्चार, नंतर अनुस्वार अक्षराचे हे सर्व रूप अर्धेंदूप्रमाणे असेल. पृथ्वी, सूर्य गोल असले तरी त्यांच्या अर्ध वा अंशभागाचे दर्शन कधीच होत नाही. पण चंद्राला क्षय वृद्धी किंवा १६ कला असल्यामुळे तो अर्धा दिसू शकतो. या सर्वाच्या आधी तारा जोडला की गणेशमंत्र झाला. ओम गॅ-येथे मात्र अर्धेन्दु च्या माथ्यावर आहे. मराठी भाषेत अशा अक्षरमाथी अर्धेन्दु आढळत नाही. पण इंग्रजी शब्दांचे लेखन करताना तशी आवश्यकता जाणवू लागली. उदा. Man- मॅन, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा अर्धचंद्र योजला असे आढळते. पुढच्या भागात हेच वर्णन पुन्हा सांगितले आहे. गकार:पूर्वरूपम् अकारो(वर्ण) मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिंदुरुत्तरुपम् ( येथे अनुस्वार दिल्यानंतर पुन्हा बिंदु कोणता हे माझ्या लक्षात आले नाही)

नाद:संधानम - गण, वर्ण, अनुस्वार असा क्रम सांगितला असला तरी उच्चार (नाद ) मात्र सर्वांचे अनुसंधान ठेवून एकत्रच करायचा आहे.

संहिता संधि: - या सर्वांची संधि म्हणजे संहिता होईल. संहिता या अपौरूषेय मानल्या जातात. लेखनविद्येला अजरामरत्व प्राप्त होण्यासाठी या सर्वांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता आहे.
या गणेशविद्येचा छंद आहे निचृद्गायत्री. गायत्री छंद म्हणजे चरण प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात. पण गणेशविद्येत अक्षरांची संख्या जास्त आहे. म्हणून त्या छंदाला निचृद( विशाल) हे विशेषण जोडले असावे.
काळ पुढे सरकत राहिला. लेखनकलेची भरभराट झाली. हळूहळू हातानेच लेखन करायची आवश्यकता कमी झाली. छपाईयंत्र अस्तित्वात आली वेगाने त्यांचा वापरही वाढला. आजचे तर संगणकयुगच आहे.

संगणकाचा शोध लागल्यानंतर प्रमाणित केलेल्या कोष्टकांत फक्त ५२ जागा होत्या. कारण रोमन लिपीत फक्त २६ अक्षरे आहेत. त्यांची कॅपिटल स्मॉल ही रूपे, म्हणून ५२ जागा पुरेश्या ठरल्या. पण कोणत्याही भारतीय भाषेत अक्षरेही जास्त आहेत, जोडाक्षरेही आहेत बाराखडीनुसार वेगळी रूपेही आहेत. मराठीत ५२ अक्षरे आहेत. अभंग ज्ञानेश्वरी, पावस मध्ये म्हटले आहे, "मुळात अक्षरे बावन्न. त्यातल्याच अक्षरांचा मंत्र. अक्षरे सगळेच सारखे बोलत असतात. पण मंत्राचे सामर्थ्य अक्षरांना नसते, तर मंत्राला तो म्हणण्याच्या पध्दतीला असते." संगणकाचा उपयोग भारतीय भाषेला कसा करता येईल असा विचार होऊ लागला. मग ध्वनीपरमाणूंची कल्पना स्फुरली. ५२ परमाणू निश्चित झाले. ते ५२ जागांवर बसतील हेही लक्षात आले. तरीही प्रत्यक्ष स्वरूपांत त्याचा उपयोग करायला हवा होता. लिपीतज्ञ . श्री. वाकणकर(उज्जैन), वसंतराव भट(पुणे) मुकुंद गोखले एकत्र आले. त्यांनी ITR ही संस्था स्थापन केली. १९८४ मध्येविन्यासनावाचे वेगळे सॉफ्टवेअर तयार केले. १९७८ पासुनच काम सुरू केले होते. संगणकयुगात अक्षरजुळणी करतांना प्राचीन नियमावली उपयुक्त ठरली. आता आपण संगणकावर मराठी, हिंदी, संस्कृत लिहू शकतो. येत असलेल्या काही अडचणी हळूहळू दूर होतीलच.
"धन्य ती गणेशविद्या।ओम गॅ गणपतेय नम:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा