सोमवार, २४ जून, २०१९

विष्णुसहस्रनाम भाग 4

विष्णुसहस्रनाम भाग ४

सृष्टीचे रक्षण, संगोपन करणे म्हणजे पृथ्वीवरील माणसे, वृक्ष, फळे, फुले, प्राणी यांचेही रक्षण आणि संवर्धन आहेच. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचे संरक्षण करतो आणि त्या सर्वांनाही त्याच्या या कार्याची जाणीव आहे म्हणून तो जनेश्वर (३४१)आहे. ४,५,६,८,९ भूतभव्यभवतप्रभु (तिन्ही काल ) भूतकृत, भूतभृत,भूतात्मा,भूतभावन:आहे.

वृक्ष - स्वत: जमिनीत पाय -मुळे रोवून उभे राहतात. वादळवारे, पाऊस यांच्यापासून स्वत:चे आणि आश्रयास आलेल्यांचे रक्षणही करतात. रक्षणाचे काम करणाऱ्या विष्णूचा हा गुण त्यांनी घेतला आहे. निवडक वृक्षांचा इथे उल्लेख आहे.

न्यग्रोध: (८२२)वटवृक्ष - हा चिरंजीव आहे कारण त्याच्या पारंब्या जमिनीत शिरून त्यापासून पुन्हा वृक्ष निर्माण होतील.पृथ्वीच्या वरही याचा विस्तार असतो व पृष्ठभागाखालीही असतो. वादळवारे, नद्यांना आलेले पूर, पावसाची संततधार, वीज यापासून स्वत:चे रक्षण तो सहज करतो.

उदुम्बर (८२३)- औदुंबर - अंबराच्याही (आकाश ) पलीकडे असणारा. 

अश्वत्थ (८२४)-पिंपळ - क्षणभंगुर जग हे याचे स्वरूप आहे. गीतेत ऊर्ध्वमूल अध :शाखं असे ह्याचे वर्णन आहे. पादचतुर : असेही पिंपळाचे एक नाव आहे.

फुले
प्रामुख्याने पद्माचा उल्लेख आहे. 
पद्मी (३४४) हातात कमल धारण करणारा, 
पद्मनिभेक्षण(३४५) - कमळासारखे डोळे, 
(३४६) पद्मनाभ, 
(३४८)पद्मगर्भ - हृदयरुपी कमळात ज्याची उपासना केली जाते. (३४७)अरविंदाक्ष:- कमळासारखे डोळे. 
कुमुद:(५८९)चंद्रविकासी कमळ, कुमुद:(८०७),(५१५)
मुकुंद:- पांढरी कण्हेर, (८०८) 
कुन्दर:(८०९)कुंद :-स्वच्छ,सुंदर, शुद्ध फळे देणारा,पवित्र
(९५२)पुष्पहास : -विकसित फुलाप्रमाणे विलोभनीय हास्य असणारा.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा